मनोगत

कर्मयोगीकै. आप्पासाहेब काडादी यांच्या दूरदृष्टीतून श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेजच्या माध्यमातून 1953 पासून ज्ञानदानाचे अखंड कार्य सुरूआहे. काळाच्या बदलत्या स्थित्यंतराबरोबर शिक्षणक्षेत्रातील नवोपक्रम कॉलेजच्या विविध उपक्रमातून सध्या सुरूआहेत .सोलापूरच्या मध्यवर्ती ठिकाणीअसलेल्या कॉलेज मधूनअनेक दिग्गज मंडळींनी शिक्षण घेऊनआपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यातून संगमेश्वरची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा निर्माण झाली. न्यायमूर्तीअजितशहा, न्यायमूर्ती भीमराव नाईक ,विधानसभेचे माजी सभापती प्राध्यापक ना. स. फरांदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे माजी स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री -लक्ष्मणराव ढोबळे, राज्याचे महाधिवक्ताॲडव्होकेटआशुतोष कुंभकोणी, जिल्हाधिकारी स्वामीनाथ कलशेट्टी, आंतरराष्ट्रीय धावपटू वंदना शानभाग, अनघा देशपांडे या माजी विद्यार्थ्यांनी ही शैक्षणिक परंपरा निर्माण करून या शिक्षणसंस्थेचा नावलौकिक वाढवला .

सद्यस्थितीत केजी टू पीजी पर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली मिळावे यासाठी संस्था प्रयत्नशीलआहे.

आपला

धर्मराज काडादी